in ,

महाविकास आघाडीच्या तिसऱ्या विकेटसाठी भाजपकडून ‘ट्विटरवर टाईट फिल्डिंग’

माजी वनमंत्री संजय राठोड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यानंतर तिसरी विकेट हि जाणार असे वातावरण भाजपने राजकीय वर्तुळात निर्माण केले आहे. मात्र ही तिसरी विकेट नेमकी कुणाची जाणार आहे ? याबाबत अद्याप भाजपकडून सस्पेन्सच बाळगला आहे. मात्र इतकं नक्की आहे, भाजपने हि तिसरी विकेट काढण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देश्मुख यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आज निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल परब यांनी देखील मुंबई महानगर पालिकेतील 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी 2 कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितलं होतं”, असं सचिन वाझेंनी पत्रात म्हटलं आहे.या लेटरबॉम्बनंतर तिसऱ्या विकेटची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांनी लावलेले सर्व आरोप खोडून काढले. “जे बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले आहेत”, असं अनिल परब म्हणाले आहेत.

अनिल परब यांनी आरोप फेटाळल्यानंतर भाजपकडून ट्विटरवर तिसऱ्या विकेटसाठी फिल्डिंग सुरु असल्याचे निदर्शनास आले. सर्वच नेतेमंडळींनी परब यांना टार्गेट करण्यात सुरुवात केली.

वस्त्रहरण अटळ आहे…

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवरून अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे. “ओ परिवार मंत्री… शपथ काय घेता… शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा… पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे”, असं नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भाजपानं या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याची पूर्ण तयारी केल्याचं दिसून येत आहे.

खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रकार

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सचिन वाझेंच्या पत्रावरून अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “अच्छा, म्हणजे सचिन वाझेची विधानसभेत करण्यात आलेली वकिली हा खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रकार होता तर…आजकाल इतका प्रामाणिकपणा कुठे पाहायला मिळतो??”, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

राजीनाम्यासाठी न्यायालयाच्या आदेशांची वाट पाहावी लागणार

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. “आता अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी देखील न्यायालयाच्या आदेशांची वाट पाहावी लागणार का?” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटरवर उद्धव ठाकरेंना टॅग केलं आहे.

एनआयएकडे शपथ चालत नाही

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा परब यांच्यावर टीकेचा बाण सोडला. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, पण एनआयए कडे कोणती ही शपथ चालत नसल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात लसीकरणाची चैन ब्रेक; अनेक जिल्ह्यातील केंद्रे पडली बंद

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर याचं निधन