in

‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तून अडीच लाख कोरोना बाधित रुग्णांवर उपचार

Share

राज्यातील हजारो रुग्णांना आज ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जीवनदायी ‘ ठरली आहे. करोना काळात ज्या वेळी केवळ खासगीच नव्हे तर पालिका व शासकीय रुग्णालयातही सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात होते तेव्हापासून म्हणजे एप्रिल ते २५ सप्टेंबरपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तब्बल अडीच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात ८४ हजार कॅन्सर रुग्णांचा समावेश आहे तर हृदयविकाराचा त्रास झालेल्या २९ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या गेल्या सहा महिन्यात कॅन्सर रुग्ण, गर्भवती महिला तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसह वेगेवेगळ्या शस्त्रक्रियांसाठीच्या रुग्णांचे अतोनात हाल झाले. याशिवाय कोरोना रुग्णांनाही रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी खूप धडपडावे लागले. याच काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेने २३ मे रोजी सर्वप्रथम आदेश काढून रुग्णोपचाराची व्याप्ती वाढवली. यापूर्वी पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. तो वाढवून पांढरी शिधापत्रिका असलेल्यांचाही समावेश या योजनेत केल्यामुळे राज्यातील तब्बल १२ कोटी लोक योजनेचा लाभ घेऊ शकत होते.

कोरोना काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील १००० रुग्णालये कोरोना रुग्णांसह सामान्य रुग्णांवर व्यवस्थित उपचार करतील याची काटेकोर काळजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी घेतल्यामुळे २५ हजार गर्भवती महिला व्यतिरिक्त सुमारे अडीच लाख रुग्णांवर गेल्या पाच महिन्यात उपचार होऊ शकले. यात कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. कोरोनाच्या मागील काही महिन्यात टाटा कॅन्सर रुग्णालयातही साधारणपणे नियमित कामाच्या ४० टक्केच काम होत होते. त्यामुळे कॅन्सर रुग्णांचा एक मोठा वर्ग महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या रुग्णालयांकडे वळला. यात केमोथेरपी अन्य तपासण्या व संदर्भात उपचाराचा लाभ ६७,५४७ रुग्णांनी घेतला.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कंगना-बीएमसी वाद ; हरामखोर कुणाला म्हणालात? राऊतांना द्यावं लागणार कोर्टात उत्तर

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर