in

Mahashivratri 2021 |महाशिवरात्रीत ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी

आज वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तिथीला महाशिवरात्री साजरी होती. हा दिवस महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो. भगवान शंकर ह्याच्या उपवासामधील महाशिवरात्री ही फार महत्वाची मानली जाते. या दिवशी भाविक उपवास करुन भगवान शंकराची पूजा करतात. तसेच महाशिवरात्रीचा उत्सव हा देशभरात आनंदाने साजरा केला जातो. 

तुळशी – भगवान शिव आणि गणपतीला तुळस वाहिली जात नाही. कारण भगवान विष्णूने तुळशीला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आहे.
तिळ – भगवान शिवला तिळ किंवा तिळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करू नयेत. असे मानले जाते की, तीळची उत्पत्ती भगवान विष्णूच्या गाळातून झाली आहे. म्हणून शिवलिंगावर तिळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करु नयेत.
हळद आणि कुंकू– शिवलिंगावर हळद कुंकू आणि यापासून बनवलेल्या वस्तू कधीही वाहू नये.
नारळचं पाणी – शंकराला नारळ अर्पण केला जातो पण नारळाचे पाणी वाहू नये. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये पैशांची कमतरता आहे.
उकळलेले दूध – भगवान शिवला उकळलेल्या दुधाचा अभिषेक करू नये. शिवलिंगावर थंड पाणी आणि कच्च्या दुधाचा अभिषेक केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कल्याण-डोंबिवलीमध्ये 11 मार्चपासून कठोर निर्बंध!

एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला आग