in

महाशिवरात्री विशेष : ‘आत्मारामा’ला शोधायचा प्रयत्न म्हणजेच ‘महाशिवरात्र उपासना’

प्रत्येकजण आपल्या आयुष्यात सुख, शांति, समृद्धि आणि समाधान मिळवण्यास दिवस-रात्र परिश्रम करत असतो. प्रपंच आणि परमार्थ यांची तारेवरची कसरत करत एखाद्या डोंबाऱ्याप्रमाणे खेळत असतो. भौतिक सुख मिळवताना आपण, आध्यात्मिकतेची जोड़ घेऊन आपल्या कर्माच्या बळावर आपल प्रारब्ध भोगत असतो.

प्रश्न असतो तो म्हणजे, सर्व सुखांची रेलचेल मिळवून आणि उपभोगून मनाला शांती मिळते का? दिवसभर कष्ट करूनही आपल्याला सुखाची झोप लगाते का?

आपला हा ‘जीव किंवा देह’ मंदिरामध्ये ‘राम’ शोधत असताना आपल्या मनामध्ये असलेल्या ‘आत्मारामा’ला शोधायचा प्रयत्न करणे म्हणजेच ‘महाशिवरात्र उपासना’ करणे होय. महाशिवरात्र म्हणजे शिवतत्त्व आणि पृथ्वीतत्त्वाचं मिलन. शिवरात्री म्हणजेच ‘शिव’ म्हणजे मन आणि रात्री (ज्याचा अनुवाद रात्री म्हणून होतो), म्हणजेच आराम आणि शांती.

भगवान श्रीशंकराचा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला देवी पार्वतीशी विवाह झाला. पंचामृत, जल, भांग, बेलपत्र वाहून श्री शंकराची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. भक्तगण दिवसभर उपवास करतात. यावर्षी शिवयोग 11 मार्च 2021 असून चंद्राचं भ्रमण मकर राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्रात आहे. राजस, तम आणि सत्व या तीनही गुणांचा समतोल साधण्यासाठी धार्मिक अनुष्ठान, रुद्राभिषेक तसेच महामृत्युंजय मंत्रजाप शिवरात्रीला केला जातो.

आध्यात्मिक प्रगती, भौतिक सुखप्राप्ती आणि आत्मिक शांतीसाठी आध्यात्मिक उपायांबरोबर मनमंदिरात प्रयत्न, जिद्द, कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा केलेला अभिषेक आणि संयमरुपी नंदीला शरण गेलो तर, खऱ्या सुखाची नांदी झाल्याशिवाय रहाणार नाही.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग पूजा (राशीनुसार) –

👉 मेष – महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी कच्चे दूध आणि दही द्यावे.
👉 वृषभ – महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगाला माव्याची मिठाई अर्पण करावी.
👉 मिथुन – या राशीच्या लोकांनी क्रिस्टलच्या लिंगाची पूजा करावी आणि लाल गुलाल, अक्षता, चंदन, अत्तर आणि जल लिंगावर अर्पण करावे.
👉 कर्क – या राशीच्या व्यक्तींनी चंदन व अष्टगंधाने शिवलिंगावर अभिषेक करावा. मनुका आणि मैद्यापासून बनवलेल्या रोटीचा नैवेद्य दाखवा.
👉 सिंह – या राशीच्या व्यक्तीनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर फळांचा रस आणि पाणी द्यावे.
👉 कन्या – या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर बोराची फळ, पिंपळपान (धतुरा), भांग आणि रुईपुष्प अर्पण करावे. शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी शिवलिंगाला अर्धप्रदक्षिणा घाला.
👉 तुला – या राशीच्या व्यक्तींनी पाण्यात सफ़ेद फुले टाकून शिवलिंगास अर्पण करावे. तसेच भगवान शिव यांना गुलाब, तांदूळ, चंदन, बेल आणि मोगरा अर्पण करा.
👉 वृश्चिक – या राशीच्या व्यक्तिनी महादेवाला शुद्धजल किंवा गंगाजळ अभिषेक करुन शिवलिंगावर मध, तूप अर्पण करा आणि नंतर परत जलाभिषेक करून पूजा करावी.
👉 धनु – या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करुन व सुक्या मेव्याचा नैवेद्य द्यावा.
👉 मकर – या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर गहू आणि श्रीफळ अर्पण करावे.
👉 कुंभ – या राशीच्या जातकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पांढरे व काळे तीळ अर्पण करावे. त्याशिवाय पाण्यात तीळ घालून, शिवलिंगास अभिषेक करा.
👉 मीन – या राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली द्विप प्रज्ज्वलन करावे, त्याशिवाय शिवलिंगाला हरभरा डाळ अर्पण करावी.

वास्तुउपाय – आपल्या वास्तुच्या उत्तरेकडे जलतत्व आहे, तिथेच पारद शिवलिंगाची आणि कुबेर मूर्तीची स्थापना करू शकता. पण 11 तारखेला चतुर्दशी म्हणजेच रिक्त तिथी असल्याने नवीन उपक्रम किंवा हा उपाय इतर शुभमुहूर्तावर करू शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन वाझेंचा शिवसेनेशी संबंध काय, उद्धव ठाकरे म्हणाले…

आमदार निधीत १ कोटीची वाढ