in

Maharashtra Unlock : जाणून घेऊयात कोणते जिल्हे झालेत अनलॉक ? काय बंद आणि काय सुरू राहणार

राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान राज्यातील कोणते जिल्हे अनलॉक झाले आहेत ते पाहूयात…

जिल्ह्यांची वर्गवारी ?

पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दुसरा टप्पा : दुसऱ्या टप्प्यामध्ये अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तिसरा टप्पा : तिसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा आहे.

चौथा टप्पा : चौथ्या टप्प्यामध्ये पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

पाचवा टप्पा : पाचव्या टप्प्यामध्ये कायम रेड झोन असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. वरील ४ टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.

पाच टप्पे ?

पहिला टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर

पाचवा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.

काय बंद काय सुरु ?

पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यात सर्व काही सुरू असणार असल्याची माहिती आहे.

दुसऱ्या टप्पा :

 • दुसऱ्या टप्प्यात हाॅटेल , माॅल चित्रपट गृह आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के सुरू असणार आहे.
 • लोकल बंद, सार्वाजिनक जागा, खुले मैदान , मॉर्निंग वॉक, सायकलिंग, शासकीय आणि खासगी सगळे खुली, शुटींग चित्रपट सुरू
 • लग्न सोहळा मंरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० पाहुण्यांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे.
 • अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल.
 • मिटींग आणि निवडणूक ५० टक्के उपस्थितीत
 • बांधकाम, कृषी काम खुली, जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के सुरू
 • शासकीय बस आसाम क्षमता १०० टक्के सुरू
 • जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज लागणार नाही, मात्र रेड झोन भागात जायचे असल्यास ई पास लागणार आहे.

तिसरा टप्पा

 • तिसऱ्या टप्प्यात जमावबंदी, संचारबंदी कायम असणार आहे.
 • अत्याआवश्यक दुकाणे सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील.
 • अत्याआवश्यक दुकाणे सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील.
 • लोकल. रेल्वे, माॅल्स थेटर्स सर्व बंद राहतील
 • सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील.
 • मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पाहते ५ ते सकाळी ९ मुभा
 • ५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
 • आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार ,
 • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
 • मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
 • लग्नसोहळ्यात ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील.
 • कृषी सर्व कामांना मुभा
 • ई कॉमर्स दुपारी २ पर्संत सुरु राहील.

चौथा टप्पा

 • चौथ्या टप्प्यात संचार बंदी लागू असणार आहे.
 • अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहणार आहेत.
 • क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार
 • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही
 • लग्न सभारंभाला २५ लोकांची आणि अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार
 • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
 • शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार
 • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
 • सलून, जिम ५० टक्के क्षमता सुरु राहणार,
 • बसेस ५० टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Local; मुंबई लोकल सर्व सामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार ? विजय वडेट्टीवार म्हणाले…

Maharashtra Unlock : महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक केलेला नाही; वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचं स्पष्टीकरण!