in

Maharashtra Weather Forecast: मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Share

महाराष्ट्रात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता हवामान विभागाने (IMD) पाऊस पुन्हा जोरदार पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान,मराठवाडा, पश्चिम विदर्भात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज आहे.

कोकणमध्येही पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई या ठिकाणी आकाश ढगाळले राहिले. तर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी येथे पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस पडत आहे. तर कोकणमधील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

सर्वसामान्यांना दिलासा ; सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित होणार !

Onion Export Ban: Statewide agitation of Congress against onion export ban

Onion Export Ban: कांदा निर्यात बंदीच्या विरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन