in

Maharashtra Unlock | आजपासून तुमच्या शहर, जिल्ह्यात काय सुरु काय बंद!

आज, सोमवारपासून मुंबई, ठाण्यासह राज्याच्या बहुतांश भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे. पंचस्तरीय विभागणीनुसार दुसऱ्या स्तरात असलेल्या ठाणे शहरातील दुकाने दिवसभर खुली राहणार असून, तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. शासनाच्या आदेशानुसार आता मुंबई , ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक , पुणे , पिंपरी चिंचवड , औरंगाबाद , सोलापूर आणि नागपूर महापालिकांचे स्वतंत्र युनिट असेल. तेथिल महापालिका प्रशासनाला आपल्या भागासाठी वेगळी नियमावली काढण्याची मुभा आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गसाखळी तोडण्यासाठी राज्यभरात लागू असलेले संचारबंदीसह कठोर निर्बंध साप्ताहिक बाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे पाच स्तरांत शिथिलीकरण करण्यात आले आहेत. तसेच याबाबतचा आढावा दर आठवडय़ाला घेण्यात येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी

‘केंद्रानं तंबी दिली म्हणून पुनावाला लंडनला निघून गेले’