in ,

राज्यात ‘अनलॉक’चा नवा प्लॅन; ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू

Share

मुंबई: केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातही ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत.

लॉकडाऊन जसा टप्प्याटप्प्याने लावला तसा तो आता एकदम उठविण्याऐवजी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत लॉकडाऊन चा कालावधी वाढविला असला तरी 3, 5 आणि 8 जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे एका अर्थाने अनलॉकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे असे म्हणता येईल आणि म्हणूनच याला “मिशन बिगीन अगेन” असे म्हटले आहे.

चौथ्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने रेड झोन वगळता इतर ठिकाणी अनेक सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. आता रेड झोनमध्ये येणाऱ्या महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातील रेड झोनमध्ये मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर परिसरातील इतर महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या ही महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक गोष्टी आता टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.

मिशन बीगिन अगेनचा पहिला टप्पा:

मिशन बीगिन अगेनचा पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ३ जूनपासून अनेक गोष्टी सुरू होणार आहेत.

  • सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसतील. बीच, सरकारी-खासगी मैदानं, सोसायट्यांचे मैदानं, गार्डन अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल. समूहाने कोणतीच कृती करता येणार आहे. लहान मुलासोबल एका मोठ्या व्यक्तिला राहता येईल.
  • प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कामाला सुरूवात करता येईल.
  • गॅरेजेस सुरू करता येतील. पण गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल.
  • अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल.

मिशन बीगिन अगेनचा दुसरा टप्पा:

हा दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

  • ५ जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी असेल. मात्र, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नसेल. परंतु यासाठी नियम असेल तो म्हणजे पी1 आणि पी2 असा. म्हणजेच रस्त्याच्या/लेनच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी सुरू असतील. परंतु त्यांना केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच काळात दुकाने सुरू ठेवता येतील.
  • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.
  • लोकांनी दुकानांवर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. शिवाय, यासाठी वाहनही वापरता येणार नाही.
  • एखाद्या मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास, ते मार्केट तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.
  • टॅक्सी, कॅब आणि रिक्षा यांनाही ५ जूनपासून परवानगी असेल. मात्र त्यासाठी १+२ अशा संख्येचे बंधन असेल. म्हणजेच चालक अधिक दोन प्रवासी घेऊन आता टॅक्सी, कॅब आणि रिक्षा सुरू करता येतील. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

मुसळधार सरींना कोल्हापूर गारेगार!