in

मोठी बातमी! उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; अशा पध्दतीने पाहू शकता निकाल

Maharashtra SSC 10th Result 2020: MSBSHE expected to declare Class 10 results
Maharashtra SSC 10th Result 2020: MSBSHE expected to declare Class 10 results
Share

महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख आता जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहाता येणार आहे. 1 जुलैच्या पुर्वी दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपुर्वी दिली होती. अखेर सर्व विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र एसएससी परीक्षांवर त्याचा परिणाम जाणवून आला होता. दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा म्हणजेच भुगोलचा पेपर रद्द करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला होता. २१ मार्च रोजी इतिहासाचा पेपर घेण्यात आला होता आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे भुगोलचा पेपर लांबणीवर पडला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचई) यापूर्वी जाहीर केले होते की भूगोल विषयाच्या पेपरसाठी परीक्षेच्या इतर विषयांत मिळणार्‍या सरासरी गुणांच्या आधारे गुण दिले जातील.

अधिकृत वेबसाइटवर निकाल कसा पाहाल…
1) mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2) तिथे असलेल्या “SSC Examination Result 2020” या ऑप्शनवर क्लिक करा.
3) तिथे तुम्हाला विचारलेली माहिती सबमिट करा.
4) तुम्हाला तुमच्या नावे असलेला रिसल्ट समोर दिसेल.
5) आलेल्या माहितीमध्ये तुमचं नाव आणि तुमचा सिट नंबर तपासून पाहा.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

In Raj Thackeray Maidan ठाकरे Corona battle, the state government is ignoring an important issue.

राज ठाकरे मैदानात… कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होतंय.

म्हणून सुशांतच्या गर्लफ्रेंडवर त्याच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला…