in

कृषी कायद्यांना विरोध : चक्काजाम आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रतिसाद

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीतल्या शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्काजामची घोषणा करण्यात आली होती. या आंदोलनाला महाराष्ट्रातूनही प्रतिसाद मिळाला. राज्यात ठिकठिकाणी अनेक संघटनांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती.

पुण्यातील हडपसर रस्त्यावर शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर सांगलीत कृषी कायद्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनावेळी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी काही काळ ताब्यातही घेतले होते.

साताऱ्यातही बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली विविध संघटनांनी रस्ता रोखून धरत चक्का जाम आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी थाळी वाजवून मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच वाशिम, नाशिक, औरंगाबाद, अकोला, वर्ध्यातही चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

संजय राऊत यांचा इशारा
मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाकडे गांभीर्यानं पहायला हवं. अन्यथा पुन्हा हिंसा झाल्यास त्याला मोदी सरकारच जबाबदार असेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोहटा देवी मंदिरात परंपरेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा प्रकार… चौकशीचे न्यायालयाचे आदेश

CoronaVirus : रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली