in ,

राज्यात यंदा पडणार ‘एवढा’ पाऊस

यंदा राज्यात सरसरी ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ, रामचंद्र साबळेंनी व्यक्त केलाय. साबळे यांनी राज्यातील 14 स्थानिकांकडून डेडा प्राप्त केला. त्यावरून त्यांनी राज्यातील पावसाच्या पूर्वानुमानाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार कोकणामध्ये ९८ टक्के, पश्चिम महाराष्ट्रात ९९ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९८ टक्के, मराठवाड्यात ९८ टक्के तर विदर्भात १०० टक्के सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाश कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यात पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. यामध्ये अकोला, पाडेगाव, निफाड आणि दापोली, पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव व परभणीचा समावेश आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे, अशी माहिती डॉ. रामचंद्र साबळेंनी दिली. यंदा केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशीरा म्हणजे ३ जून रोजी दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशाच्या GDPमध्ये 7.3 टक्क्यांची घसरण

Maratha Reservation | EWS आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही