in

Maharashtra Lockdown | आता 25 जणांच्या उपस्थितीतच उरकावं लागणार ‘शुभमंगल’

राज्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू असणार आहे. अशातच आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लग्न सोहळ्यांसाठीही नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. जर या संचारबंदीच्या काळात तुम्ही लग्न करणार असाल किंवा तुमचं लग्न नियोजित असेल तर राज्यात आता लग्न समारंभांसाठी नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 50 नाहीतर 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. तसेच लग्न सोहळ्याच्या नियोजनासाठी तुम्ही जर केटरिंग किंवा इव्हेंट कंपनीची मतद घेणार असाल तर त्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपाच्या ‘या’ आमदारानं घरीच घेतली कोरोना लस

राज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या