in

Maharashtra HSC Result Date 2020 | अशाप्रकारे उद्या जाहीर होणार 12 वीचा निकाल

Maharashtra HSC Result Date 2020 | Thus, the result of the 12th will be announced tomorrow
Maharashtra HSC Result Date 2020 | Thus, the result of the 12th will be announced tomorrow
Share

काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. बोर्डाने 16 जुलै अशी अधिकृत तारीख जाहीर केली आहे. उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईनरित्या पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या http://mahresult.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहाता येणार आहे. याबाबत नुकतीचं अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

13 जुलै रोजी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाची लिंक प्रदर्शित करण्यात आली होती, त्यामुळे 13 जुलै रोजीच निकाल पाहायला मिळणार असा अनेकांचा समज झाला होता. कारण लिंक जरी अपडेट केली असली, तरी तो निकाल कधी जाहीर होणार यावर कोणतीच माहिती बोर्डाने दिली नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा गैरसमजदेखील झाला होता. त्यानंतर बोर्डाकडून स्पष्टीकरण दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर झाला होता.

निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?

http://www.hscresult.mkcl.org/

http://www.hscresult.mkcl.org

http://www.maharashtraeducation.com

या अधिकृत वेबसाईट बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी सादर केल्या आहे.

असा पाहा निकाल –
वरीलपैकी एका वेबसाईटवर जाऊन वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचा सिटनंबर अपलोड करायचा आहे. सोबतच काही माहिती विचारली जाईल, (उदा. आईचे नाव) त्यानंतर तुमला निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Smugglers in Nashik in full lockdown ...

भरलॉकडाऊनमध्ये नाशकात तस्करांची धुडगुस…

डीवायएसपी अंगद जाधवांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…