in ,

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

शिवसेना खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आणि निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षानंतर शिवसेना संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांचे घर आणि सामना कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त प्रशांत कदम संजय राऊत यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. आता राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. त्यामुळे राणेंविरोधात शिवसैनिकांमध्ये संताप उसळला होता. त्यानंतर राणेंना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना जामीनही मिळाला होता. मात्र, या दरम्यान, राणे आणि राऊत यांच्या दरम्यान शाब्दिक चकमकी सुरूच होत्या. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे-मोहन भागवत यांची भेट

सोनम कपूर प्रेग्नंट? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर