in

दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वाढली

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. राज्यात आज दिवसभरात २ हजार ६२८ नवीन करोनाबाधित सापडले असून ३ हजार ५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण १९ लाख ५२ हजार १८७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७६ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यात ३३ हजार ९३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ५२ हजार १८७ रुग्ण बरे झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या ३३ हजार ९३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७६% झाले आहे.

गृहमंत्री पॉझिटिव्ह

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. तसेच संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus : दिवसभरात साडेतीन हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात

शेतकरी संघटनांचा आज देशभर ‘चक्का जाम’;तीन राज्यांना आंदोलनातून वगळलं