in

Maharashtra Corona | दिवसभरात १६ हजार ३७९ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यभरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाग्रस्तांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.४५ टक्के झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात १६ हजार ३६९ रूग्ण करोनातून बरे झाले, तर १० हजार ९८९ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, २६१ कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५ लाख ९७ हजार ३०४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.४५ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख १ हजार ८३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर १.७४ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आदर्श भाडेकरू कायद्याला शिवसैनिकांचा विरोध…नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

”पंतप्रधान मोदी- शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोना पसरला”