in

Maharashtra corona | दिलासा… राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला

राज्यभरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. आजही कोरोनाग्रस्तांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची आकडेवारी वाढली आहे.

राज्यात आज तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी कोरोनाबाधित आढळले आहेत. दिवसभरात २१ हजार ७७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १३ हजार ६५९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.o१ टक्के झाले आहे. तर, राज्यात आज ३०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BMC Unlock | मुंबई मनपाचे परिपत्रक जारी… ‘अनलॉक’साठी महत्वाचे नियम

खासगी रुग्णालयांकडे लशीचा ५० टक्के साठा