in

CoronaVirus : दिवसभरात साडेतीन हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात आज (शुक्रवार) दिवसभरात सुमारे साडेतीन हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यानुसार रुग्ण बरे होण्याचा दर 95.76 टक्के झाला आहे. तर, राज्यात आज जवळपास अडीच हजार नवे रुग्ण आढळले.

राज्यात दिवसभरात नव्या 2 हजार 628 करोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा 20 लाख 38 हजार 630 इतका झाला आहे. आजपर्यंत 1 कोटी 48 लाख 75 हजार 633 नमूने तपासण्यात आले. त्यातील 3 हजार 513 रुग्णांनी करोनावर मात केली. आजपर्यंत एकूण 19 लाख 52 हजार 187 रुग्णांनी करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

राज्यात आज 40 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा 51 हजार 255 झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.51 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंधराव्या वित्त आयोगाची तरतूद; राज्याला १, ४५६ कोटींचा निधी

दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वाढली