in

CoronaVirus : रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात दिवसभरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या अधिक होती. गेले दोन दिवस करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळली होती. हे ध्यानी घेता आता थोडी चिंता वाढली आहे.

राज्यात आज नव्या 2 हजार 768 कोरोना रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 49 लाख 28 हजार 130 नमुन्यांपैकी 20 लाख 41 हजार 398 नमुने (13.67 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 19 लाख 53 हजार 926 जण करोनातून बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह केसेसची संख्या 34 हजार 934 झाली आहे. सध्या 1 लाख 73 हजार 504 व्यक्ती होमक्वारंटाइन आणि 1 हजार 980 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात आज 1 हजार 739 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 53 हजार 926 झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.72 टक्के आहे. तर दुसरीकडे, दिवसभरात 25 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा 51 हजार 280वर पोहचला असून मृत्यूदर 2.51 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कृषी कायद्यांना विरोध : चक्काजाम आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रतिसाद

दिल्लीतल्या संजय कॉलनीत भीषण आग