in

महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रभारी एच.के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह; ‘त्या’ बैठकीत दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Share

महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रभारीपदी नुकतेच नवनियुक्त झालेले एच.के. पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात पाटील यांनीच ट्वीट करून माहिती दिली. विशेष म्हणजे एच.के. पाटील यांनी नुकतीच मुंबई दौऱ्यावर येऊन राज्यातील वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती.

एच.के. पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये माहिती देताना सांगितले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी 10 दिवसांसाठी स्वत;ला क्वारंटाईन केले आहे. माझी सध्या तबियत ठीक आहे. मात्र गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी असे अवाहन त्यांनी केले आहे.

धक्कादायक म्हणजे गेल्या गुरुवारीच एच.के. पाटील मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाहि संसर्ग झाला नसावा अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Unlock 5 : आज होणार नव्या नियमांची घोषणा

Gold Rate today । मार्चनंतरची सोनं दरात सर्वात मोठी घसरण