राज्यात सध्या सचिन वाझे, परमबीर सिंह, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर संपूर्ण प्रकरणाने नवं वळण घेतलंय. यानंतर महाविकास आघाडी सरकारवर चिखलफेक करण्यास विरोधकांनी सुरुवात केली. सध्या आघाडीतील मंत्री एकमेकांना सांभाळून घेत असले, तरीही, अंतर्गत खदखद मोकळी करण्यासाठी पक्षांतर्गत बैठका होत आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेस नेत्यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चेतील मुद्दे गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र, उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हप्ता वसुलीचे केलेले आरोप, यामुळे राज्यातील आघाडी सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. यासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
भाजप सरकारच्या काळात राज्य प्रशासनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मोक्याच्या व महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करण्यात आल्या. सरकार बदलले तरी संघनिष्ठ अधिकारी अजून त्याच पदांवर आहेत, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी तेच भाजपला छुप्या पद्धतीने मदत करत आहेत, अशी चर्चा काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत झाल्याचे समजते.
Comments
Loading…