in ,

महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यपालांची भेट

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागांचा प्रश्न गेली आठ महिन्यांपासून कोशियारी यांच्या पातळीवर रखडला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटीची वेळ दिली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांना भेटणार आहेत. संध्याकाळी ७:३० वाजता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत.

मागील आठवड्यात महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आली नाही, असं त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं होतं. तर त्याच दिवशी संध्याकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबरला भेटीसाठी वेळ देण्यात आली. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.

राज्य सरकारने राज्यपालांकडे १२ नावांची यादी पाठवली असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांवरून महाविकास आघाडी आणि आघाडीचे नेते राज्यपालांवर टीकास्त्र सोडत असतात. महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत एका याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने मत व्यक्त केलं होतं आणि आता यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आमदारांच्या रखडलेल्या यादीवर भेट होणार असून विधान परिषदेतील 12 आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाली काढला. ‘या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे’, असं न्यायालयाने नमूद केलं.

तसेच, ‘सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा. अशाप्रकारे नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत. राज्यपालांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. ते कधीपर्यंत द्यावं हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे’, असंही यावेळी न्यायालयाने म्हटलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनुष्काचं लोकांना केले ‘हे’ आवाहन

Kannada Ghat; नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून मदत जाहीर करणार; अब्दुल सत्तार यांनी ‘लोकशाही न्यूज’ला दिली माहिती