महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून यावेळी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला.
शेतकऱ्यांना मदत आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याविषयी विधानसभा अध्यक्षांनी निर्देश घेण्याचे आवाहन केले. त्यावर अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सरकार काळजी घेईल, असं म्हटलं. त्यावर सरकार काळजीवाहूचं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.
Comments
Loading…