राज्य मंत्रिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले. १ ते १० मार्च दरम्यान सुरू असलेल्या या वादळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवर घेरले. यंदा अधिवेशनात सहा विधेयके पारित करण्यात आली. कोरोनानंतर महाविकास आघाडी सरकारने मांडलेला पहिला अर्थसंकल्प 13 कोटी जनतेला दिलासा देणारा असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये सहा विधेयके संमत करण्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात झालेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब उपस्थित होते.
अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता, गुंठेवारी नियमाधीन करणे व त्याची श्रेणी वाढ करणेबाबत, महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी वाढवणे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक ही सहा विधेयके संमत करण्यात आली.
सन 2021 चे राज्य विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
नवीन पुर:स्थापित विधेयके – 6
प्रलंबित विधेयके – 2
(१) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 1 – महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021
(२) सन 2021 चा विधानसभा विधेयक क्र. 2 – महाराष्ट्र गुंठेवारी विकास (अधिनियमन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, 2021
(३) सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 3- महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2021 (विधानसभेत संमत दि. 04.03.2021, विधानपरिषदेत संमत दि.04.03.2021)
(४) सन 2021 चा विधानसभा विधेयक क्र. 4 – महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2021
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार दि. 5 जुलै 2021 पासून सुरू होणार आहे, असे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घोषीत करण्यात आले.
Comments
Loading…