in

महापुरामुळे महाड MIDCला मोठा फटका; उद्योगांचे कोट्यवधीचे नुकसान

महाड तालुक्यात आलेल्या महापूराचा औद्योगिक क्षेत्राला देखील मोठा फटका बसला एमआयडीसीतील उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या एमआयडीसीत  छोटे , मोठे आणि मध्यम असे मिळून जवळपास पावणे दोनशे उद्योग आहेत.

पुराच्या पाण्यात यातील बहुतांश उद्योग बाधीत झाले. पहिल्यांदाच या एमआयडीसीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यात कंपन्यांमधील यंत्रसामुग्री बरोबरच कच्चा माल आणि तयार माल पाण्याखाली गेला होता. इथं कायम स्वरूपी आणि कंत्राटी मिळून 20 हजार कामगार , कर्मचारी काम करतात. इथला वीजपुरवठा अजूनही बंद आहे. अनेक उद्योग लवकर सुरू होतील अशी स्थिती नाही त्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज कुद्रांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

गहना वशिष्ठविरोधात मुंबईत FIR दाखल