in

महाड इमारत दुर्घटनेला 12 तास पूर्ण;एकाचा मृत्यू सहा जखमी आणि 25 बेपत्ता

Share

भारत गोरेगावकर : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात काजळपूरा भागात तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेला आता 12 तास पूर्ण झालेत. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जन गंभीर जखमी आहे. तसेच सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 25 जण दबले आहेत. एनडीआरएफ युद्ध पातळीवर या नागरिकांचा शोध घेत आहेत. (Raigad Breaking : महाड इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर एकजण जखमी)

तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. या घटनेनंतर एनडीआरएफच्या तीन तुकड्या रात्री एक वाजता घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाल्या होत्या. दरम्यान रात्री उशीरा पर्यंत केवळ सात लोकांनाच सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे.

या दुर्घटनेला आता बारा तासांचा कालावधी उलटून गेला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीमध्ये दुर्घटनाग्रस्त इमारती मधील पंचवीस लोकं बेपत्ता असून त्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. मागील बारा तास बचाव कार्य सुरू आहे. तरीही अद्याप पर्यंत पंचवीस जणांचा शोध लागला नाही आहे. एनडीआरएफचे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरूच आहे.

रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आमदार भरत गोगावले आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक हे तळ ठोकून बसले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रात्री तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Gauri Pujan: When will Gauri arrive? Learn, auspicious moments and different methods

गौरीपूजन : कधी होणार गौरी आगमन? जाणून घ्या, शुभ मुहूर्त व विविध पद्धती

…जेव्हा 26 वर्षांनी रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी मिळते!