लोकशाही न्यूज नेटवर्क
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता विनाअनुदानित १४.२ किलोच्या घरघुती वापराच्या सिलिंडरची किंमत ७६९ रूपयांवर गेली आहे. यापूर्वी हे दर ७१९ रुपये इतके होते. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
आठवड्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली. दिल्लीत आता पेट्रोलचे दर ८९ रूपयांच्या जवळ पोहोचले आहे. इतकंच नाही दर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं ९९ रूपयांचा तर काही ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरीही पार केली आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधीनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. “जनतेकडून लूट, विकास फक्त दोघांचा ,” असे कॅप्शन लिहित ट्वीट केलं आहे. तसंच यासोबत एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या दराचं वृत्तही त्यांनी शेअर केलं आहे.
Comments
Loading…