in ,

ही पाहा, मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात, राष्ट्रवादीचा पलटवार

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत आभार प्रदर्शन करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले. तसेच त्यांनी देशभरातील आंदोलकाना ‘आंदोलनजीवी जमात’ म्हणून डिवचले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोदींच्या वक्तव्याचा हाच धागा पकडून एक व्हिडीओ शेअर करत पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांच्यासह काँग्रेसला कृषी क्षेत्रात सुधारणा हव्या आहेत. मात्र, अचानक यू-टर्न घेतल्याने मी हैराण आहे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना लगावला. कृषी सुधारणा शरद पवारांनाही हव्या आहेत. ते सत्तेत असताना त्यांनी तसं म्हटलं होतं. कृषी सुधारणाच्या पद्धतीमध्ये वादविवाद असू शकतो. पण सुधारणा झाल्या पाहिजेत, हे त्यांचं मत होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

शरद पवार यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांनीही कृषी सुधारणांबाबत मत व्यक्त केलं आहे. शरद पवार यांनी अजूनही या सुधारणांना विरोध केला नाही. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं आणि सुधारणा करत राहू. कृषी क्षेत्रात सुधारणा हव्या आहेत असं बोलणारे आज विरोधी पक्ष यू टर्न घेत आहेत, कारण राजकारण मध्ये येत आहे, असा निशाणा पंतप्रधान मोदी यांनी साधला.

त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक व्हिडीओ शेअर करत त्यामध्ये भाजपाचे वीज बिल दरवाढ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन, केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केलेलं गॅस सिलिंडर दरवाढीविरोधातील आंदोलन आदींचे फोटो या व्हिडीओतून दाखून राष्ट्रवादीने भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND Vs ENG: भारतासमोर ३८१ धावांचं आव्हान… सामना निर्णायक टप्प्यावर

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृत्यू