in

Lokshahi Impact; जेवणात सापडलेल्या अळी प्रकरणी दिले चौकशीचे आदेश

Share

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या भिवंडी येथील टाटा आमंत्रा या कोवीड सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या जेवणात अळ्या सापडल्याची घटना घडली होती. या सबंधित वृत्त लोकशाहीने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून आता या संबधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

टाटा आमंत्रा या कोवीड सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात अळ्या आढळून आल्याचा एक व्हिडिओ चन्द्रेश मुंबरकर या रुग्णाने व्हायरल केला होता. या व्हिडीओवरून लोकशाही न्यूज चॅनेलने कोरोना रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता.

लोकशाहीच्या या वृत्तानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच सबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद देत व सोयाबीन पुरविणाऱ्याच्या चौकशीचे व कारवाईचे आदेश केडीएमसीचे सचिव संजय जाधव यांनी दिले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

Today Gold Price | 11000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी तर 2500 रुपयांनी कमी झाले सोन्याचे दर