in

Lokshahi Impact; लोकशाहीच्या बातमीनंतर हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल

मयुरेश जाधव | अंबरनाथच्या मलंगगड परिसरात काही हुल्लडबाज तरुणांनी दारू पिऊन स्टंटबाजी केल्याचे वृत्त लोकशाही न्यूजने दाखवले होते. या वृत्ताची दखल उल्हासनगरच्या हिल लाइन पोलिसांनी घेत, स्टंबाजी करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ तालुक्यात बुधवारी पहिल्याच पावसाने थैमान घातल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं.याच दिवशी भर पावसात मलंगगड परिसरात काही तरुण भरधाव कारने स्टंटबाजी करत होते. त्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हायलर होणाऱ्या व्हिडीओ मध्ये रस्त्याने एक कार भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. तर दुसरा कारच्या पुढच्या काचेला लटकून एक तरुण बोनेटवर दोघे पाय ठेवून उभा आहे. एका तरुणाच्या हातात गाडीची स्टेअरिंग आहे. तर इतर दोन तरुण गाडीतील खिडकीतून बाहेर दरवाज्यावर बसले होते हीच बातमी लोकशाही न्यूजने दाखवल्यानंतर त्या बातमीची दखल घेत आज हिललाइन पोलीसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

स्टंटबाज करणारे चौघे तरुण अंबरनाथ तालुक्यातील हेदूटणो गावात राहणारे असून या चौघांना हिललाईन पोलिसांकडून नोटीस देण्यात आली अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंडारे यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा

पालघरवासियांना दिलासा; जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार