in

मांसाहारी पदार्थांन मिळणार नवी ओळख

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेचं एफएसएसएआई (FSSAI)ने आत मांसाहारी पदार्थाच्या वरती असणाऱ्या लोगो मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल आहे. याआधी मांसाहारी पदार्थांवर वरती एका लाल रिकामी चौकोनामध्ये गडद लाल रंगाचा बिंदू असणारा लोगो होता. तर शाकाहारी पदार्थावर हिरव्या रिकामी चौकोनामध्ये हिरवा बिंदू असणारा लोगो होता. परंतू आता मांसाहारी पदार्थांच्या लाल बिंदू ऐवजी लाल त्रिकोण दिसणार आहे. अंध आणि रंगहीन लोकांची मोठी संख्या पाहता हा बदलला जात आहे .

शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थाची लोगो बदलण्याच्या विषयावर खाद्य उद्योगांशी चर्चा केल्यानंतर सरकार नवीन निकष निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने नवीन फूड लेबलिंग नियमन तयार केले आहे. आयात केलेल्या खाद्यपदार्थांच्या लेबलिंगसाठी हे नवीन नियम १ जुलै २०२१ पर्यंत लागू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. जाहिरातींमध्येही शाकाहारी किंवा नॉन-वेजचा लोगो स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. याव्यतिरिक्त, फूड पॅकवरील हा लोगो ब्रँड आणि उत्पादनांच्या नावासह स्पष्टपणे दर्शविला जाणे आवश्यक आहे. हे नियम अंमलात आणण्यासाठी अन्न उद्योगास नव्या पॅकिंगवर खर्च करावा लागणार आहे. हे लक्षात घेता या नियमांच्या अंमलबजावणीसाठी थोडा वेळ देण्याची मागणी उद्योग करीत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

शेतकरी आंदोलनाबाबत मोठी बातमी; कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

एलॉन मस्क नंतर आता हे आहेत ‘सर्वात श्रीमंत व्यक्ती’