in ,

‘ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर, तिथे लॉकडाउन कायम राहणार’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

नवी दिल्ली: आज देशव्यापी लॉकडाउनचा ३४ वा दिवस असून कोरोनाला परतवण्यासाठी लागू केलेला १९ दिवसांचा दुसरा देशव्यापी लॉकडाउन संपण्यास सहा दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. येत्या ३ मे रोजी देशव्यापी लॉकडाउन लागू होऊन ४० दिवस होणार आहेत. या कालावधीत कोरोनाचे संकट संपलेले नसून देशातील प्रमुख शहरांमध्ये ते आणखी गंभीर झाले आहे.

देशातील लॉकडाउन वाढवावे असे १० राज्यांनी पंतप्रधानांना सांगितले. यात दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, ही राज्ये आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर नाही, अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये सूट देण्यात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच अर्थव्यवस्थेबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, असेही मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात लॉकडाउनच काय होणार?

ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे, अशा राज्यांमध्ये लॉकडाउन सुरू राहणार असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच ३ तारखेनंतर लॉकडाउन उठवल्यानंतर राज्यांना आपली रणनीती तयार करावी लागेल. केंद्र सरकारनं लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात राज्यांना निर्णय घेण्यास सांगितलं. यासंदर्भात धोरण ठरवण्याची सूचनाही मोदी यांनी केली आहे.

त्यामुळे राज्यातील लॉकडाउनचं काय होणार असाही प्रश्न चर्चेत आहे. राज्यातील जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत, त्या जिल्ह्यामधून लॉकडाउन शिथिल करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संवाद साधताना दिले होते. मात्र, लॉकडाउन शिथिल करताना राज्य सरकार जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवल्या जातील.

दुसरीकडे ऑरेंज झोनमध्ये असलेल्या काही जिल्ह्यातील परिस्थिती आता सुधारली आहे. अशा जिल्ह्यामध्येही खबरदारी घेत व्यवहार सुरू करण्याची परवानगी सरकार देऊ शकते. मात्र, रेड झोनमध्ये असलेल्या जिल्हे ३ मे नंतरही लॉकडाउनमध्येच राहणार आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोना दीर्घ काळासाठी राहणार आहे, “ दो गज दूरी” हा जीवनाचा मंत्र बनवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती