in ,

30 नोव्हेंबरपर्यंत या भागांत अजूनही लॉकडाऊन सक्तीचा

Share

देशभरात अनलॉक प्रक्रिया राबवली जात असताना आता पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउन 30 नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

अनलॉक प्रक्रिया राबवत केंद्र सरकारने अनेक गोष्टींना नियम आणि अटींसह संमती दिली होती. जसे हॉटेल्स, रेस्टॉरंट, जिम नियमाअधीन राहून खुली करण्यास परवानगी दिली होती. मात्र आता कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे.

गृह मंत्रालयाने आज पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार रिओपनिंगबाबत 30 सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नितीशकुमार यांच्यावर भाषणामध्ये भिरकावली चप्पल

या कोजागिरी पौर्णिमेला दिसणार ब्लू मून म्हणजेच निळा चंद्र