in ,

महाराष्ट्रात लॉकडाउन की निर्बंध? आज निर्णय होण्याची शक्यता

मुंबईत 3 हजारांपेक्षा रोज रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. राज्यात मंगळवारी 28 हजार 699 रुग्ण नव्याने आढळले असून तब्बल एकशे बत्तीस रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे राज्यातील रिकवरी रेट 88.73 टक्के एवढी झाली असून दिवसेंदिवस पूर्ण संख्या वाढताना दिसत आहे, अशा परिस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर येथे स्थानिक पातळीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील इतर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरात दररोज रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कदाचित महाराष्ट्रमध्ये पुढील काळामध्ये वाढती संख्या पाहता लॉकडाउन पुन्हा एकदा जाहीर करण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः शहरी भागात आणि ग्रामीण भागात जिथे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि कंटेनमेंट होऊन असलेल्या भागात कदाचित कठोर निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?; परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सुनावणी

Imtiaz Jaleel : युती तुटल्याचा फटका जनतेला का?