in

“लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाऱ्यांसाठी डेथ वॉरंट”

शासनाने ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने व्यापारी संकटात आले आहेत. शासनाने वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू ठेवायला हवी होती. पुढे सण आहेत. व्यापाºयांनी माल भरला आहे. त्याच्या रकमेची परतफेड करायची आहे. व्यापार बंद राहिल्यास परतफेड कशी करणार, असा सवाल आहे. त्यामुळे व्यापारी आणखी संकटात येणार असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

राज्य शासनाने सोमवारी काढलेला लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाºयांसाठी ‘डेथ वारंट’च असल्याचे मत विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केले. मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CJI पदी मुख्य न्यायाधीश NV Ramana

Ajay Devgn | बॉलीवूडचा सिंघम संपत्तीबाबत खराखुरा किंग