in ,

लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय; राजेश टोपेंचे मोठे विधान

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाउन लागू होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येवर राजेश टोपे म्हणाले, अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होत असल्याचे ते म्हणाले. तसेच आज फक्त ३६०० रुग्ण वाढले आहेत. ही आकडेवारी सोमवारच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

लॉकडाउन बाबत टोपे म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल,” असं ते म्हणाले आहेत. “जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने कोरोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असेही टोपे म्हणले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपाचा सुशांतसिंह प्रकरणात सहभाग! काँग्रेसचा आरोप