in

नागपूर शहरात संपूर्ण लॉकडाऊन – पालकमंत्री राऊत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन करणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. नागरिकांना शहरात विनामास्क फिरता येणार नाही. शहरात नागरिकांना विनाकारण फिरता येणार नाही, असंही पालकमंत्री राऊत यांनी सांगितलं आहे.

येत्या १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.

राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी नागपुरात एकाच दिवशी १७१० कोरोना रुग्ण आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६१,०५३ झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

Covid19 Vaccination | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस