in , ,

मुंबईत पुन्हा लॉकडाउन? पहिला बडगा ‘नाइट क्लब’वर

राज्याच्या अनेक भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. औरंगाबादमध्ये आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर, अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचा विचार स्थानिक प्रशासन करत आहे. मुंबईतही अंशत: लॉकडाऊन केले जाऊ शकते, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज दिले आहेत.\

मुंबईत लॉकडाउन लागू करण्यासाठी सध्या कोणत्याही प्रकारची घाई नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढली असल्याचं यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू

महापालिकेने सध्या करोना चाचण्यांची संख्या २० हजारांपर्यंत वाढवली आहे. जानेवारीत जवळपास ११ ते १५ हजार चाचण्या होत होत्या. दरम्यान महापालिकेने नागरिकांना करोनासंबंधित नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. जर नियमांचं योग्य पालन केलं नाही तर पालिकेने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबईत मंगळवारी १०५१ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या सध्या तीन लाख १२ हजार ४५८ वर पोहोचली आहे. करोनामुळे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ५०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण : मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Budget Session | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस