in ,

लॉकडाऊनमध्ये विनाकारण वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई; ३ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल

Share

गोंदिया: कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी २२ मार्चला जनता कर्फ्यु करण्यात आला. परंतु २३ मार्चपासुन केंद्र व राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन केला आहे. लॉकडाउन मध्ये ही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्या वर वाहतुक नियमान्वये कारवाई करून दंड वसुल करण्याची मोहिम जिल्हा वाहतुक शाखेने चालविली आहे. विनाकारण रस्त्यावर येणा-या १ हजार ७१४ लोकांना २३ मार्च ते ८ एप्रिल या काळात दंड करण्यात आला आहे.

चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणुन पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. कारण नसताना देखील एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला व पोलिसांना समाधान कारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवुन त्याचा वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या ना कोणत्या त्रृट्या दाखवुन पोलिस कार्यवाही करीत आहेत. लॉकडाउन मुळे वाहतुक पोलीस आणखीच कडक नियम लावुन कारवाई करीत आहे. हे कडक नियम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे.

२ मार्चपासुन कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे. दुचाकी, चारचाकी अशा १ हजार २६८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ लाख ६१ हजार ९०० रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. लॉकडाउनचे पालन व्हावे हा एकमेव या मागचा उद्येश आहे. तसेच दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या या लढाईत आपण घरी राहून जिंकता येईल एक मात्र या मागील उद्येश आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मालेगाव मध्ये नवीन ५ कोरोनाबाधित रुग्ण; नाशिक जिल्ह्याात कोरोनाबाधितांची संख्या १२ वर

कोरोनाबाधित रुग्णासाठी वर्ध्यात रंगीत तालीम, कोरोनाग्रस्त सापडल्याच्या चर्चांना उधाण