in

पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय 1 एप्रिल नंतर, उप मुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

राज्यात जशी कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, त्याप्रमाणेच पुण्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे पुणेकरांना 1 एप्रिलपर्यत अल्टीमेट्म देण्यात आले असून,संसर्ग नियंत्रणात न आल्यास 2 एप्रिलनंतर कठोर निर्णय घेणार असल्याचा इशारा पालकमंत्री व उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

ण्यात आज पालकमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठ्कीत त्यांनी जिल्ह्यातील परीस्थिती गंभीर असून नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी साधारण 50 टक्के खासगी रुग्णालयांचे बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सद्यस्थितीत शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची 300 केंद्र आहेत आता ही केंद्र दुप्पट करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोठी बातमी : मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

पुणेकरांवर 2 एप्रिलपर्यंत असणार ‘हे’ निर्बंध