राज्यात पुन्हा कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात 36 तास संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजतापर्यंत वर्ध्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वर्ध्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत.
वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी असणार आहे. वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहील.. हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी, एसटी, ऑटोरिक्षा सेवा बंद राहील.. जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहणार आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे . नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलं आहे.
Comments
Loading…