in ,

महिला प्रवाशांसाठी लोकलची दारे खुली; मात्र रेल्वे बोर्डाकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही…

Share

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने महिला प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या 17 ऑक्टोबरपासून सर्वसामान्य महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. ज्यावेळी रेल्वे बोर्ड या विनंतीला मंजुरी देईल त्याच वेळी अधिकृत रित्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवास करता येईल. त्यामुळे उद्यापासून महिलांना लोकलने प्रवास करता येईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता 15 जूनपासून लोकल ट्रेन टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. या संदर्भात राज्य सरकारने एक समिती स्थापन केली असून तिच्या बहुतांश सदस्यांनी नॉन पिकअवरमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 नंतर महिलांना लोकलचा प्रवास करण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव सरकारपुढे सादर केला होता.त्यानुसार राज्य सरकारने महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. लोकलचा प्रवास करण्यासाठी महिलांना क्यु आर कोडची आवश्यकता नाही. महिला तिकिट घेउन प्रवास करु शकणार आहेत. उपनगरीय रेल्वेने सुमारे ८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात.त्यापैकी महिला प्रवाशांची संख्या ४२ टक्के आहे.

रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविणार

राज्य सरकारने महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचे मागणीपत्र रेल्वेकडे पाठविले आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीकरिता रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येईल. रेल्वे बोर्डाची परवानगी मिळताच महिलांना प्रवासाची मुभा दिला जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबई लोकल संदर्भात सर्वात मोठी बातमी; महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करण्याची मुभा

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी