in

मद्यालये, उपहारगृहे रात्री 1 पर्यंत सुरू

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे मात्र कोरोनाचा रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागताच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला मर्यादित वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हॉटेल्सही मर्यादित वेळेसाठी खुली करण्यात आली ग्राहकांच्या संख्येवर घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक हॉटेल मालकांनी नाराजीचा सूर उमटत होता.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्तरॉ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दुकाने, तर सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचे नियम कायम आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिल्लीतल्या संजय कॉलनीत भीषण आग

मुंबईत शिवसेनेचा भाजपला धक्का