in

रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या जिल्हा बँकेला ईडीचं पत्र

मंगेश जोशी | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आणि त्यांच्या परिवाराला ईडीला सामोरे जावे लागत असतांना त्यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा बँकेने एका खासगी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाबाबत लेखी स्वरूपात माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कोणी ईडी लावली तर आपण सीडी लावू अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी एकनाथराव खडसे आणि त्यांच्या जावयाला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर अध्यक्षा असलेल्या जिल्हा बँकेला सुद्धा एका खासगी साखर कारखान्याला देण्यात आलेल्या कर्जासंदर्भात ईडीतर्फे माहिती देण्याच पत्र आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना लोकशाही न्यूजने संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.याबाबत बँकेचे मुख्याधिकारी जितेंद्र देशमुख यांनी ईडीची नोटीस मिळाली असल्याच्या वृत्ताच खंडन केले असून मुक्ताई नगर येथील साखर कारखान्याला दिलेल्या कर्जा बाबत लेखी स्वरूपात माहिती ईडी ृच्या वतीने मागविण्यात आल्याच म्हटलं आहे.या घटने नंतर मात्र खडसे परिवारावर ईडी कडून करण्यात येत असलेल्या चौकशा पाहता जळगाव जिल्ह्यात विविध चर्चा ना उधाण आल्याच पाहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

खेड, चिपळूणमधील अतिवृष्टी; मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत २३ लाखांचे वाटप