in

सोन्याच्या किमतीमध्ये ९००० रुपयांची घट

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोनं खरेदी करणार्‍यांसाठी आजच्या दिवशी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी सोन्याच्या किंमती पुन्हा खाली आल्या आहेत. याशिवाय आज चांदीच्या दरामध्ये देखील घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा फ्यूचर ट्रेड ३९.०० रुपयांनी घसरून ४७,२१७, रुपयांवर आला.

मागील ६ सत्रांपैकी ५ सत्रांमध्ये सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत, ऑगस्ट २०२० मध्ये वधारलेल्या सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅम ५६,२०० रुपयांवरून ९००० रुपयांनी स्वस्त झाली आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची विक्री देखील वर्चस्व राखत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सोन्या-चांदीवरील आयात करात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. सोन्या-चांदीवरील आयात शुल्कामध्ये ५ टक्के कपात आहे. सध्या सोन्या-चांदीवर १२.५ टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. ७ टक्के वजा केल्यानंतर केवळ ७.5 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होत असल्याचे दिसून येईल.

दिल्लीतील सोन्याचा दर
२२ कॅरेट सोन्याची किंमत – ४६२२० रुपये
२४ कॅरेट सोन्याची किंमत – ५०४२० रुपये

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समोसा खात मिया खलिफाचा पुन्हा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

Farmers Protest | ‘बुद्धीजीवी’ ऐकल होत, पण काही लोकं ‘आंदोलनजीवी’ झाले – पंतप्रधान