in

वर्ध्यात रुग्णालय परिसरात बिबट्याने माजवली खळबळ

भूपेश बारंगे वर्ध्या :वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच बिबट्या झाडावर चढल्याचे आढळले. काही वेळेत कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्न दरम्यान बिबट्यानं परिसरातीलच नाल्यात शिरकाव केला. जवळ जवळ अर्धा तास वनविभागचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत होते. तर रस्त्यालगत असलेल्या नाल्यात त्याने आडोसा घेतल्याने रुग्णालय समोरील मुख्य मार्ग बंद करण्यात आला आह

दिवसाढवळ्या बिबट्या सावंगी रुग्णालयाच्या परिसरात आढळल्याने अनेकांना धक्का बसला या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णाचे नातेवाईक राहत असल्याने भीतीचे वातावरण पसरले. मात्र बिबट्याच्या दर्शनाने कोणालाही कोणतीच हानी झाली नसल्याने रुग्णालय प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. रुग्णालयात परिसरात बिबट आढळल्याचे माहिती नागरिकांना मिळताच बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

67th National Film Awards : रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मान

हिरो नंबर वन ‘झी मराठी २०२१’ च्या मंचावर