in

वर्ध्यात सहा तासानंतर बिबट्याला केलं जेरबंद

भूपेश बारंगे | वर्ध्याच्या सावंगी रुग्णालय परिसरात आढळलेला बिबट्या आत्ता तब्बल सहा तासांनी जेरबंद करण्यात आलाय. तब्बल सहा तास हा बिबटया नालीमध्ये दडला होताय. वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद केले आहे. बंदुकीचा नेम धरत तीनदा इंजेक्शन देण्याचा प्रयत्न नालीमधून करण्यात आला. अखेरच्या प्रयत्नांत बिबट्या बेशुद्ध झालाय.

नालीत शिरलेल्या बिबट्याला अखेर रेस्क्यू करण्यात आले आहे. आपण या दृष्यांमधून पाहू शकता बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलंय. रुग्णालयाच्या गेट समोर असलेल्या मोठ्या नालीत या बिबट्याने आडोसा घेतला होता. बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न सतत सुरू असताना अखेर बिबट्याला इंजेक्शन च्या सहाय्याने बेशुद्ध करण्यात आलय.

बेशुद्ध केलेल्या बिबट्यावर उपचार

सावंगी रुग्णालयात आढळलेल्या बिबट्याला सहा तासानंतर वनविभागच्या रेस्क्यू टीमने बेशुद्ध करून बिबट्याला जेरबंद केले असून त्याच्यावर उपचार करून त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागने सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उल्हासनगरमध्ये श्रेयवादाची लढाई, भूमिपूजनावरून शिवसेना-मनसे आमनेसामने

‘खाकीतली माणुसकी’; वर्दीतल्या देवदूतांमुळे वाचले तरुणाचे प्राण