in

शिडी चढून बिबट्या आला वरती…. विहिरीतून ‘रेस्क्यू’

नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील बावनदरा परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला अनेक तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने सुखरुप बाहेर काढले. काल रात्रीच्या सुमारास बावनदरा शिवारातील विनय माधवराव बच्छाव यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता.

शेतकरी बच्छाव हे आज विहिरीवरील मोटर सुरू करण्यास गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे निर्दशनात आले. वनविभागाला त्याची माहिती दिल्यानंतर वनविभागाने अगोदर खाट सोडून नंतर शिडीच्या सहाय्याने बिबट्याला वर काढले. मात्र त्याला जेरबंद करण्याअगोदरच बिबट्याने बानदराच्या जंगलात धूम ठोकली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

रे-नगरात आंदोलन, ४०० आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात