in

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका; नैसर्गिक अधिवासात सोडले

देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभाग, पोलीस आणि ग्रामस्थांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरुप सुटका करण्यात आली. बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. देवळाच्या लोहोणेर येथील डोन शिवारातील कमलाकर नेरकर यांच्या घराजवळील विहिरीत भक्ष्याच्या शोधार्थ असलेला बिबट्या पडला होता. बिबट्या विहिरीत पडला असल्याची घटना संध्याकाळी पाच वाजता निदर्शनास येताच तातडीने वनविभागाला कळवण्यात आले.

वनविभागाचे पथक येईपर्यंत बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बिबटयाला बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेत बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय तपासणी नंतर नैसर्गिक अधिवासात बिबट्याला सुखरुप सोडण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोलापूर जिल्हा काँग्रेसवर धवलसिंह मोहिते पाटील, भाजपाला शह देण्याचा प्रयत्न

Pathan 2022| लवकरच खान चाहत्यांच्या भेटीला येणार…