in

नाशकात बिबट्याचा थरार… गंगापूर रोड परिसरात वावर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र


नाशिक शहरातील मुख्य वस्तीत असणाऱ्या गंगापूर रोड परिसरात बिबट्याने दहशत पसरवली आहे. शहरातील नरसिंह नगर येथे नागरी वस्तीत आज सकाळी बिबट्या शिरल्याने धावपळ उडाली.

वन खात्याचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी आले असले तरी बिबट्याच्या मागे त्यांची धावपळ सुरू आहे. बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात वन क्षेत्रपाल विवेक भदाणे यांना बिबट्याने पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनी बिबट्याला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.

दरम्यान, अक्षरधाम सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर सध्या बिबट्या असून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यातसाठी वनखात्याची कसरत सुरू आहे.नाशिक शहरातील नरसिंह नगर – आनंदवली भागात यापूर्वीसुद्धा दोन ते तीन वेळेस बिबट्याचे दर्शन झाले होते.

आला होता आज सकाळी अनेक नागरिकांना मॉर्निंग वॉकला जाताना खासदार भारती पवार यांच्या घराजवळ बिबट्या आढळला त्यामुळे पोलिसांनी वनखात्याला कळविण्यात आले . ही माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये ‘लोकशाही’च्या प्रतिनिधीला मारहाण… रुग्णालय स्टाफची दादागिरी

टाटांनी करून दाखवलं , २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करणार